मुंबई | दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम सुरू असून पालिकेच्या कामाला भाजपचे आमदार नितेश राणे विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर राणेंनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे विरोध दर्शविला आहे. राणेंनी म्हटले, “मुंबईला पर्यटनाच्यादृष्टीने सुशोभित करून पर्यटनकांना आकर्षित केलेच पाहिजे , ही आमचीपण भूमिका आहे पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशाचा गैरवापर होता कामा नये. हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी MRTP कायद्याने आपल्यावर टाकली आहे.”
दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम सुरू आहे. या गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्यावर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे.
सदर पक्के बांधकाम कुठलेही CRZ नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून पिलर्स बांधून केले गेले आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झाले आहे. आणि भविष्यात त्यामुळेच ग्रीन ट्रॅब्युनलकडून (NGT) दंडपण आकारला जाईल. MRTP व CRZ ACT प्रमाणे कारवाई करावी, अन्यथा मला MRTP ACT कलम 56 (A) अंतर्गत संबधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई संबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल, असा इशाराही राणेंनी आयुक्तांना दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.