HW News Marathi
Covid-19

आयटी कर्मचारी आता थेट पुढच्याच वर्षी ऑफिसला जाणार 

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राने आता आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्‍यांच्या ‘वर्क फ्रॉम होम’ची मुदत थेट २०२० या वर्षाच्या अखेरपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच आयटी कर्मचारी थेट ३१ डिसेंबर २०२० नंतरच ऑफिसला जाऊ शकतील. यापूर्वी आयटी कर्मचाऱ्यांच्या ‘वर्क फ्रॉम होम’ची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. मात्र आता ही मुदत थेट ५ महिन्यांनी वाढवून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत करण्यात आली आहे.

“कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता केंद्रीय दूसरसंचार मंत्रालयाने ‘वर्क फ्रॉम होम’संदर्भात इतर सेवा प्रदात्यांना (ओएसपी) अटी-शर्थींसह दिलेल्या सवलती आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत”, असे ट्विट करत केंद्रीय दूसरसंचार मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या कोरोना काळामध्ये कोणताही धोका पत्करण्यापेक्षा अनेक कंपन्यांनी स्वीकारलेला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय बऱ्याच अंशी लाभदायक ठरत असल्याचे पाहायला मिळते. जगभरामध्ये सध्या हाच पर्याय अवलंबला जात आहे.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होणार नाही !

News Desk

लोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्या! अन्यथा आंदोलनाचा भाजपचा इशारा

News Desk

होरायझन प्राईम हॉस्पिटलची कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द, अवाजवी बील आकरल्याने पालिकेचा दणका !

News Desk