HW News Marathi
Covid-19

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट, विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण 

मुंबई | मुंबईत कोरोनाचा कहर काही अंशी कमी झाला आहे. मात्र, अजूनही हवा तितका कोरोनाला आळा घालता आला नाही आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी होत असताना विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या स्वीय सहाय्यकांवर तसेच त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यालय सील करण्याची तयारी सुरू आहे. अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनाच्या ५०% कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र विधानभवनातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या निर्णयावर पुनर्विचार होण्याची आता शक्यता दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिवेशन आणि त्याची पूर्वतयारी यात अडचण निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील! – राजेश टोपे

Aprna

राज्यात नाईट कर्फ्यु लागू होऊ शकतो, महाविकासआघाडी सरकारमधील नेत्याचे संकेत

News Desk

मुंबईत आजपासून काय सुरू काय बंद? जाणून घ्या…

News Desk