HW News Marathi
महाराष्ट्र

“फक्त अधिकार देऊन फायदा होणार नाही, तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल” – उद्धव ठाकरे

मुंबई।राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. मात्र, मुंबईची लोकल, सिनेमागृह आणि मंदिर अद्यापही बंदच आहे. त्यामुळे निर्बंध आणखी शिथिल व्हावे, अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत किती लाटा येतील हे सांगता येणार नाही, अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

तर केंद्र सरकारनं आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा दूर करावी अशी मागणी

तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापत चाललं आहे. विरोधी पक्षासह अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशावेळी केंद्र सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेत 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळणार आहे. मात्र, फक्त राज्यांना अधिकार देऊन फायदा होणार नाही. तर केंद्र सरकारनं आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा दूर करावी अशी मागणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.

इम्पिरिकल डेटाची मागणी आपण केंद्राकडे केली होती

मधल्या काळात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या काळात एनडीआरएफकडून केल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषात बदल करण्याची मागमी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटाची मागणी आपण केंद्राकडे केली होती. तसंच मराठा समाजाबाबत आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला देण्याची मागणी आपण मोदींकडे केली होती. तसंच आरक्षणाची 50 टक्क्यांची अट रद्द करण्याची मागणीही आपण केली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यावर आता लोकसभेत चर्चा होईल. मात्र, फक्त अधिकार देऊन फायदा होणार नाही. तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल. तशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. मला विश्वास आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अटही काढतील. याबाबत दोन चार दिवसांत आपल्याला कळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा मनसेला धक्का; दोन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Aprna

मुंबईतील गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला, ३ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

News Desk

मुंबईत महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा परफेक्ट कार्यक्रम सुरुच, राऊतांचा भाजपला टोला

News Desk