HW News Marathi
महाराष्ट्र

देशात पहिल्यांदाच जेल पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रात येणार, येरवडा जेलमधुन होणार सुरुवात – अनिल देशमुख

नागपूर | भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पुणे येथील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (२३ जानेवारी) नागपुरात दिली. देशात पहिल्यांदाच जेल पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रात अंमलात आणण्यात येणार असुन येरवडा जेलमधून २६ जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे ,अशी माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

येत्या २६ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते येरवडा येथे कारागृह पर्यटनाचे उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे येथील येरवडा तुरूंगात पर्यटन सुरू करणार असून दुसर्‍या टप्प्यात नाशिक, मुंबई या कारागृहात सुरू करण्याचा विचार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना कारागृहात पर्यटन करण्याकरीता ५ रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तर अभ्यासकांना ५० रूपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुका बंदची हाक

swarit

नारायण राणेंना दुसरा धक्का! नाशिक पोलिसांकडून नोटीस जारी

News Desk

‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री

News Desk