HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात शिवसेनेचा डंका, महापौर निवडणुकीत बाजी मारत भाजपला धक्का

जळगाव | जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (१८ मार्च) निवडणूक पार पडली. या जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं भाजपला सत्तेवरून खाली खेचत आपला भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेनं तब्बल ४५ मतं मिळवत भाजपला धूळ चारली आहे. इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे.

जळगाव महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे ते जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने ४५ तर भाजपला ३० मते मिळाली आहेत.

बहुमताचा आकडा पार केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. महापालिकेच्या बाहेर सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला होता. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली होती. यात सुरुवातीला अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले होते. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले.

महत्वाचे म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत ५७ पैकी तब्बल ३० नगरसेवक सेनेत दाखल झाले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावली. कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले होते. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जामोदच्या वनविभाग कार्यालयाला आग, सर्व साहित्य जळून खाक

News Desk

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊत म्हणतात,सरनाईकांबद्दल लवकरच बातमी मिळेल !

News Desk

हाथरस घटना म्हणजे फक्त एका मुलीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेची हत्या – अण्णा हजारे

News Desk