HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्र्यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा!

मुंबई। केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील पाच लोकसभा मतदारसंघांत प्रवास करेल.

६५० किलोमीटर एवढा प्रवास करेल

डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाडय़ातील सात लोकसभा मतदारसंघांतून नारायण राणे यांची यात्रा १९ ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत ही यात्रा ६५० किलोमीटर एवढा प्रवास करेल. या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधतील. या यात्रांच्या संयोजनाची जबाबदारी आमदार संजय केळकर यांच्याकडे आहे.

16 ते 21 ऑगस्टदरम्यान कराडांची यात्रा

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जनआशिर्वाद यात्रा… (16 ते 21 ऑगस्ट 2021), मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा !

swarit

समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, सामनातून काँग्रेसवर बोचरी टीका

News Desk

राज ठाकरे यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव | आशिष शेलार

News Desk