HW News Marathi
Covid-19

जपानच्या वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

मुंबई | जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत मिचाओ हारडा यांनी आज (२१ मे) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. जपानमधील अनेक कंपन्या राज्यात कार्यरत आहेत. त्यांची सद्यस्थिती व येत्या काळात होणाऱ्या विस्ताराबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवीन उद्योगासाठी भाडे तत्वावर जीमीन देणार, उद्योगासाठी आण्यासाठी ४० हजार एकर राखीव, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १८ मे रोजीच्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले होते. यामुळे राज्यात नवीन गुंतवणूकदारांना प्रोत्साहन आणि आर्थिक घडी बसवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नव्याने गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्राने सर्व सुविधांसह पोषक वातावरण तयार केले आहे. गुंतवणुकदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी देसाई यांनी केले. जपानी कंपन्यांना राज्य शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढेही ते कायम ठेवले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे सर्वेक्षणातून समोर आली टक्केवारी, ७० टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपावा वाटतो

News Desk

हा तर महिन्याभराचा अघोषित लॉकडाऊन! – देवेंद्र फडणवीस

News Desk

राज्यात काल ११ हजार ८७७ कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईत ८ हजार रुग्ण

Aprna