HW News Marathi
Covid-19

बीडची चिंता वाढली ! कोरोनाबाधितांचा आकडा ३६ वर

बीड | बीड जिल्ह्यात काल (२० मे) प्रलंबित राहिलेल्या १३ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्वच १३ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. माजलगाव तालुक्यातील आकडा १२ असल्याने चिंता वाढलेली असताना आता धारुर तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कुंडी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी (१९ मे) एकूण ११४ स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यातील ४ पॉझिटिव्ह आणि ९० अहवाल निगेटिव्ह आले होते. ६ जणांचा काहीच निष्कर्ष निघाला नव्हता, १३ प्रलंबित होते तर १ रद्द करण्यात आला होता. आता त्या प्रलंबित १३ स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्हा हादरला आहे.

नव्याने नोंद झालेल्या या १३ कोरोनाबाधितांपैकी कवडगावथडी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेला १, नित्रुड ( ता. माजलगाव ) येथील ११ आणि धारुर तालुक्यातील १ असे १३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. हे सर्व माजलगाव तालुक्यातील कवडगावथडी येथे यापूर्वी आढळलेले २ रूग्ण आणि हे सर्व बाहेरुन सोबतच आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्याचा आकडा ३६ गेला आहे. त्यातील १ कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण स्वतःच्या इच्छेने उपचारासाठी पुण्याला निघून गेले आहेत. सध्याच्या घडीला जिल्ह्यात २९ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याचे शल्य चिकिश्चक डॉ. अशोक थोरात यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 मुंबईतील झोपडपट्ट्यांना आर्किटेक्ट आणि विकासक जबादार, रतन टाटांची टीका

News Desk

इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

News Desk

मुख्यमंत्र्यांनी ‘मराठा समाजासोबत आहोत’ हा विश्वास द्यावा !

News Desk