HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी जयंत पाटील यांची वर्णी

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी जयंत पाटील यांची वर्णी लागली आहे. तर प्रदेश उपाध्यक्ष पदी नवाब मलिक यांची निवड करण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग निवासस्थानी रविवारी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्ष्यात घेऊन पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे आणि नवाब मलिक आदी नेते मंडळी उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मंदिरांच्या ऐवजी बार उघडे, कल्चरची वाट”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला

News Desk

अर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम – आशिष शेलार

News Desk

राज्यातील जीआय मानांकनाना प्रतिष्ठा मिळवून देणार! – दादाजी भुसे

Aprna