HW News Marathi
महाराष्ट्र

जेव्हा तुम्ही महाराजांची उपमा कोणाला देता त्याचा विचार करायला हवा…

मुंबई | ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी झालेली तुलना याबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच भाजपा नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच आहेत असं म्हणत थेट शरद पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतला. दरम्यान उदयनराजेंच्या या आक्षेपाला सडेतोड उत्तर देत मुंबईत समर्थकांकडून शरद पवारांचे एक पोस्टर झळकावण्यात आले आहे. या पोस्टरवर शरद पवारांचा उल्लेख जाणता राजा असा करत त्यांच्या विचारसरणीला जोपासा असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी हे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, “आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यातही जाणता राजा राहणारच”.

जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत…

“शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. मागील जन्मी मुंगी एवढ पुण्य केल असेल म्हणून छत्रपती घराण्यात जन्म झाला. हे माझ सौभाग्य मानतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असं उदयनराजे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस, दरेकरांनी दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसत छावणीतच केले जेवण!

News Desk

धुळे महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर ! करेक्ट कार्यक्रम गंडला ….

News Desk

पालघरमधील ११ हॉटेल्स होम कोरोंटाईन करणाऱ्यांसाठी राखीव

swarit