मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं आज(२ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यानिमित्त जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिलं आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव, तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आलं. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील 52 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते.
स्वप्न आज पूर्णत्व कडे जात आहे
संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच काम आहे. स्वर्गीय आर. आर .पाटील यांच्या काळात टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनाचे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच स्वप्न आज पूर्णत्व कडे जात आहे, असं जंयत पाटील म्हणाले. आज सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मध्ये आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्याला पाणी मिळण्यासाठी स्वर्गीय आर. आर.पाटील हे प्रयत्न करत होते. या दुष्काळी तालुक्यात आज पाणी पोहचले आहे. कवठेमहांकाळ भागातील 13 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तर उर्वरित काही भागात ही पाणी पाहोचेल. असेही पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री मा. श्री. एकनाथराव खडसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐@EknathGKhadse pic.twitter.com/mLtPSjLT88
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 2, 2021
अद्यापही टेंभू योजनेचे का पूर्णत्वास पोहोचलेलं नाही
दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून पाण्याचा लढा 1993 पासून सुरु झाला होता. त्यानंतर 1996 मध्ये टेंभू उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकांळ, तासगाव, खानापूर, जत, मिरज, सातारा जिल्ह्यातील माण खटाव अशा 13 तालुक्यांना या योजनेतून पाणी मिळणार होते. तेव्हापासून या योजनेत अनेक गावांचा समावेश करण्यात आला पण अद्यापही टेंभू योजनेचे का पूर्णत्वास पोहोचलेलं नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.