HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत पाटलांचा सासरवाडीत पराभव, भाजपचा एकतर्फी विजय

सांगली | ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज (१८ जानेवारी) हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीमध्ये जयंत पाटील यांचे सत्ताधारी आणि विरोधी गटातून सर्व मेहुणे उभे होते. मात्र जयंत पाटील यांचे चुलत मेहुणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने इथे मोठा विजय मिळवला आहे. जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला तब्बल १५ तर राष्ट्रवादीला फक्त २ जागांवर विजय मिळाला आहे.

इतकंच नाही तर म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं. भाजपाने इथे सत्ता खेचून आणली असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटलांचे मेहुणे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये जयंत पाटील यांचा लहान मेहुणा, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी पराभूत झाले आहेत.

सांगली जिल्ह्यात १५२ पैकी ८४ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. काँग्रेस प्रणित पॅनेलला ३७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी पॅनेलकडे १३ ग्रामपंचायती गेल्या आहेत. शिवसेना पॅनेलकडे १९ ग्रामपंचायती गेल्या आहेत. भाजपकडे ७ ग्रामपंचायती गेल्या आहेत. ७ ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे १ जागा गेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारावं”, भाजपची टीका!

News Desk

“तत्कालीन फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे”, हसन मुश्रिफांचं विधान

News Desk

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या गाडी मालकाचा सापडला मृतदेह

News Desk