HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही

सातारा | संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्यात. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”जे पुरावे पुढे येतील, त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असं जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. याबाबत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विचारण्यात आले. जे पुरावे समोर येतील त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याचे स्पष्ट केलेय. चंद्रकांत पाटील यांच्याबाबत पत्रकारांनी जयंत पाटलांना विचारणा केली, त्यावर ते म्हणाले मला चंद्रकांत पाटील यांच्यापुरते मर्यादित ठेवू नका. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, असे उत्तर देत चंद्रकांत पाटील यांना थोडी विश्रांती दिली पाहिजे, असा उपरोधिक टोला देखील जयंत पाटलांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraResult2019 : जाणून घ्या…कशी होते मतमोजणी

News Desk

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी’-संजय राऊत

News Desk

मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं, चंद्रकांत पाटलांचे त्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण

News Desk