HW News Marathi
महाराष्ट्र

“काहीतरी बोलायचं म्हणून चंद्रकांत पाटील बोलतात”, अजित पवारांवर केलेल्या टीकेचा जयंत पाटलांकडून समाचार

मुंबई | काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका करताना त्यांनी एकतर राजधानी पुण्यात हलवून इथून कामकाज करावं किंवा पुण्याचे पालकमंत्री तरी बदलावेत, अशी खोचक टीका केली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या कामाचं कौतुक करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

“अजित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम अजित पवार करत आहेत. पुण्यावरही अजित पवारांचं लक्ष आहे. काही प्रश्न निर्माण झाला तर अजित पवार उपलब्ध असतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. अजित पवारांनी पुण्यात येऊन अनेकदा बैठक घेतली आहे. पिंपरीत जाऊन पाहणीही केली आहे. काहीतरी बोलायचं म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

“अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनाच त्यांच्या पक्षाचे किती लोक भेटले त्यांना माहिती नसल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापुरचे असून पुण्यात येऊन उभे राहिलेत. पुण्यातल्या लोकांनी निवडून दिल्याने पुण्यातल्या लोकांसाठी काहीतरी करत असल्याचं सांगण्याचा ते प्रयत्न करत असतील आणि त्याच्यासाठी अजित पवारांवर टीका करत असतील तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

“अजित पवार किती झपाट्याने, वेगाने आणि कशा पद्दतीने काम करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. “स्थानिक सरकार जनतेच्या बाजूने उभं राहून लसची, रेमडेसिवीरची मागणी करत असेल तर त्याच्यात श्रेयवाद नाही,” असं सांगत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील हे जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देणार का? पुन्हा एकदा यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात

News Desk

राजपूतांनाही आरक्षण द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा

News Desk

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

News Desk