HW News Marathi
महाराष्ट्र

PandharpurElection : फडणवीसांवर इतका अविश्वास दाखवणं बरं नाही, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

पंढरपूर | पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी यांना शब्द दिला आहे की, उमेदवार देणार नाही, असे मला कोणीतरी सांगितले. ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत आपण काही बोलायचे नाही. चिंता करू नका. दिलेल्या शब्दाला जागणारे फडणवीस आहेत. आताच फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य ठरणार नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय बाहेर पडू नका, असे आम्ही त्यांना आग्रहाने सांगितले आहे. इकडे नाही आलात, तरी चालेल. तुमचे निष्ठावंत सैनिक ताकदीने काम करतील. अजित पवार यांच्यापासून सर्वजण या मतदारसंघात येतील. शिवसेना आणि काँग्रेसचाही पाठिंबा आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही सांगितले आहे की, माझा पाठिंबा तुमच्यावतीने जाहीर करा. चांगल्या पद्धतीने निवडणूक यशस्वी करूया. सर्वजण मिळून भाजपचा पराभव करण्याचे काम आपण करू. अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ भालकेंना तसे सांगितले असेल, तर ते अर्ज मागे घ्यायला लावतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

सर्वानुमते भगीरथ भालकेंना उमेदवारी

सगळ्यांशी चर्चा करुन भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. वातावरण चांगलं आहे. विजय निश्चित आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे अर्ज माघरीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सर्व कायकर्ते घराघरात जाऊन प्रचार करतील, कोरोना काळ असला तरी अनेक राज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक आणि उमेदवार समाधान अवताडे दोघांनी एकमेकाविरोधात निवडणूक लढवली आहे.

त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असं वाटत नाही. त्या दोघांचे अनेक कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आल्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० मे पर्यंत शेतकरी कर्जमाफीची ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार

News Desk

भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का, दिग्गजांना त्यांच्या गावातील जागा राखण्यास अपयश

News Desk

सकाळी टीका,दुपारी OBC अध्यादेशावर सही, 12 तासांत दुसऱ्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांचे आभार!

News Desk