HW Marathi
कोरोना देश / विदेश बीड महाराष्ट्र राजकारण

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि कुटुंबाला होम क्वारंटाईन करा,बीडकरांची मागणी !

बीड|  कोरोना विषाणूचे शेकडो रुग्ण असलेल्या मुंबईहून शनिवारी बीड येथे आलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा. त्यांच्यापासून बीड जिल्ह्यातील जनतेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करुन त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन, जिल्हाबंदी, सीमा बंदी ,संचारबंदी, जमावबंदी असताना कुठली परवानगी न घेता शनिवारी जयदत्त क्षीरसागर व त्यांचे कुटुंब मुंबईहून बीड येथे खासगी वाहनाने आले. त्यांना कायद्याचं बंधन नाही का, सामान्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील माजी मंत्री भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर संचारबंदी उल्लंघन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू संपूर्ण देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश धस हे बीड जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या मदतीसाठी भिगवण (जि.पुणे) येथे गेले होते. यावरुन आमदार धस यांच्यावर संचारबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

एखाद्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यात पहिलीच घटना आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे .आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.सध्या स्थितीला बीड पोलीस क्षीरसागर यांच्या घरी दाखल झाले असून नेमकी कोणती भूमिका पोलीस प्रशासन बजावणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related posts

बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतिनाथ महाराज यांच्यासह सहकाऱ्यांची हत्या, आरोपी अटक

News Desk

सत्ताधारी नेते इतिहास बदलतील यात जराही शंका नाही म्हणूनच…!

News Desk

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा १ जवान शहीद, १ जखमी

News Desk