औरंगाबाद | भाजपला सोडचिठ्ठी दिलेले मराठवाड्यातील दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड उद्या (२४ नोव्हेंबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत उद्या गायकवाड कमळ सोडून हाता घड्याळ बांधणार आहेत. औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. गायकवाडांची समजूत घालण्याचा प्रयत्न पक्षाने केला, परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जयसिंगरावांनी उमेदवारी मागे घेतली खरी, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.
“मी जयसिंगराव गायकवाड पाटील, भाजपच्या कार्यसमिती सदस्यत्वाचा व प्राथमिक सदसत्यत्वाचा राजीनामा देत आहे,” एवढा एका ओळीचा राजीनामा गायकवाड यांनी चंद्रकांत पाटील यांना पाठवला होता. गायकवाड हे भारत सरकारमध्ये केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री होते. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. याशिवाय ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघामधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते तर तीन वेळा बीडचे खासदार राहिले आहेत.
जयसिंगराव गायकवाड यांची कारकीर्द
माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री
माजी सहकार राज्यमंत्री
माजी मराठवाडा पदवीधर आमदार (विधानपरिषद – दोन वेळा)
माजी खासदार – बीड (तीन वेळा)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.