HW News Marathi
महाराष्ट्र

JEE आणि NEET परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, जाणून घ्या नवीन तारखा

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही परीक्षा पुढे ढकलल्या तर काही रद्द करण्यात आल्या. आहे. नीटची परीक्षा आधी ३ मे रोजी होणार होती, ती पुढे ढकलून २६ जुलै करण्यात आली आहे. आज (३ जुलै) पुन्हा नीटची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घेतला आहे. NEET आणि JEE ची परीक्षा आता १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी JEE आणि मेडिकल च्या प्रवेशासाठी होणारी NEET या दोन्ही परीक्षांची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलली. NEET ची २६ जुलैला होणारी परीक्षा आता १३ सप्टेंबर ला होणार आहे. JEEमुख्य परीक्षा १८ ते २३ जुलैला होणार होती ती आता १ ते ६ सप्टेंबर आणि ॲडव्हान्स २७ सप्टेंबरला होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Aprna

अनिल देशमुखांवरील छापेमारीत राजकीय सुडबुद्धीचा प्रकार नसावा, राऊतांचे मत

News Desk

CDR मिळवणे हा गुन्हा ! सचिन सावंत यांचा फडणवीसांवर निशाणा

News Desk