HW News Marathi
देश / विदेश

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची तारीख जाहीर!

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्राश्वभूमीवर सरकारने सर्व परिसखा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. देशात आता परिस्थती सुधारत आहे त्यामुळे सरकारने परीक्षांसाठी परवानगी दिली आहे . आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जेईई ऍडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सर्व कोविड प्रोटोकॉलचं पालन करुन ही परीक्षा घेण्यात येईल,असंही ते म्हणाले. जेईई-मेन्सची चौथ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे.

JEE म्हणजे नेमकं काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करतात. जेईई ॲडव्हान्स्ड २ पेपर्स मध्ये घेतली जाते. पहिला पेपर सकाळी ९ ते १२ तर दुसरा पेपर २.३० ते ५.३० या वेळेत घेतला जाणार होता. जेईई-मेन्सच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी २० जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) च्या वरिष्ठ संचालक साधना पाराशर यांनी परीक्षा केंद्रांची सख्या वाढवल्याच सांगितले होते. कोविड १९ साथीच्या रोगामुळे या वेळी परीक्षा २३२ ऐवजी ३३४ शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक शिफ्टमधील परीक्षा केंद्रांची संख्याही ६६० वरन ८२८ करण्यात आली आहे.

परीक्षा ४ सत्रांमध्ये

JEE ची परीक्षा ४ सत्रांमध्ये घेतली जाण्याचा निर्णय देण्यात आला आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी यापूर्वी जेईई मेन २०२१ परीक्षा चार सत्रात होणार असल्याचं जाहीर केलं होते. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर करावी लागणार आहे.

JEE Advanced परीक्षेला बसणायासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बारावीला ७५ टक्के गुण मिळवणं आवश्यक होते. मात्र, यावर्षी ७५ टक्के गुणांची अट रद्द करण्यात आली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! सोन्याच्या किंमतींमध्ये घट

News Desk

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

जेव्हा सर्वोच्च न्यायालय पगार वाढीवर बोलते…

News Desk