मुंबई | पेगासस हे प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. केंद्राच्या पावसाळी अधिवेशनात देखील या विषयावरून संसदेत विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. देशातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांझी यांचा फोन देखील या तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर त्यावरून विरोधकांचा विरोध तीव्र होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून लोकांना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.
सरकार तुमचे व्हॉटसअप चॅट, एसएमएस वाचतंय
पेगासस प्रकरणावरून चांगलाच राजकारण पेटलेलं दिसून येतंय. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर ट्वीटमधून निशाणा साधतानाच सामान्य जनतेला देखील इशारा दिला आहे. “सरकार तुमचे व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस वाचतंय. तुमचे व्हिडीओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातंय. पेगॅसस हे फक्त राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
The government is reading your :
SMS
Seeing your videos and pictures
Medical records
Your payment history
Contacts #PegasusSnoopgate is not just about politicians, journalists and activists, it’s about you.Think.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 31, 2021
पेगासस काय आहे?
जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.