मुंबई | जगात कोरोना महामारीने उद्भवलेल्या संकटाचा सामना आपण सगळेच करत आहोत. अशात जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात WHO ने जगाला एक इशारा दिला आहे. तो म्हणजे आता There will be no return to the old normal ,या पुढे आधीचे जीवन जगता येणं शक्य होणार नाही. त्यातच त्यांनी पुढे कोरोनाची परिस्थिती आणखीनच गंभीर होणार असे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.
आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘सुरूवातीपासूनच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना लोकांना धीर देण्याऐवजी घाबवरण्याचे काम करत आहे. सुरूवातीला कोरोना विषाणू तितका धोकादायक नसल्याचे त्यांनी म्हटले होते आणि आपले वक्तव्य सारखे बदलत आहेत.’
From the very beginning #WHO in this #Covid_19 has been scaring the world instead of giving hope
Initially they commented #coronavirus was not that serious and now changes everyday pic.twitter.com/JnRp3yPBpU— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.