HW News Marathi
महाराष्ट्र

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा, तो कोणाचा आहे सर्वांना माहित आहे”

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. करेक्ट कार्यक्रम हा शब्द प्रयोगावरुन सध्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरुन विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला. यावेळी त्यांनी करेक्ट कार्यक्रम या शब्दावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. पंढरपूरच्या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी करेक्ट कार्यक्रम करतो हा शब्द वापरला. पण हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. तो कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहेच, असं ते म्हणाले. तसेच, भाजप नेहमीच मतांचं ध्रुवीकरण करत आला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, असंही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
कोरोना काळातील अपयशाचं खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. तसेच, ‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जयंत पाटलांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तृळात जोरदार रंगली आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
“पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो”, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्यावर इन्कम टॅक्सची छापेमारी

News Desk

जवळपास १६ तासांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश

News Desk

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, फडणवीसांचा आरोप

swarit