HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त…, पवार- शहा भेटीवर आव्हाडांचे सूचक वक्तव्य

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २६ मार्चला अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याच्या कथित वृत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्यात भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात रान उठवले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरुन भाजपचे नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची भाषाही करत आहेत. नेमक्या त्याचवेळी शरद पवार आणि अमित शाह यांची झालेली ही भेट अनेकांसाठी चक्रावून टाकणारी आहे.

हे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या खास मर्जीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण ५० वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत.

मग त्यातील कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, ओदिशातील विजू पटनाईक असो बंगाल मधले जोत्या बसू असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत. आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे यांच्याशीही शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आला. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

सब चीजे सार्वजनिक नही होती,अमित शहांचं सूचक वक्तव्य

सब चीजे सार्वजनिक नही होती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं आहे. दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकराच्या समीकरणात काही बदल होणार का? राजकीय खेळी पलटणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये विकास कामांवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

Aprna

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

News Desk

‘आम्हाला फक्त ब्रम्हज्ञान त्यांच्यासाठी कोरडे पाषाण’, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

News Desk