HW News Marathi
महाराष्ट्र

हमाम मे सब नंगे है, टीआरपी घोटाळ्यावरुन जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया!

मुंबई | टीव्ही चॅनल्स टीआरपी वाढवण्यासाठी पैसे देत असल्याची धक्कादायक माहिती काल (८ ऑक्टोबर) मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. यात रिपब्लिक चॅनलचे नाव असून आणखी २ चॅनल्सचा यात समावेश आहे. यावरुन राजकीय नेत्यांचे टीकास्त्र सुरु झाले आहे. ज्या पत्रकार अर्णब गोस्वामींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते त्यांच्यावर आता आघाडी सरकारमधील नेते आपल्या तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची या टीआरपी रॅकेटवर ट्विट केले आहे.

“राजकारणी लोकांच्या सभांना पैसे देऊन माणसे आणली जातात असं बोललं जायचं.पण आजतर टीव्ही बघायला पण लोकांना पैसे दिले जातात हे समजलं.अर्थात लॉकडाऊनमध्ये त्यांनी काय बातम्या कुठल्या बातम्या दिल्या हे विसरून गरीबांना ह्यातून पैसे तरी मिळाले ह्याचा मला आनंद आहे, हमाम मे सब नंगे है”, असे ट्विट आव्हाडांनी केले आहे.

 

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलीस आयुक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिक चॅनल, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या ३ चॅनेलवर घरांत पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचे समोर आले आहे. तसेच, रिपब्लिक चॅनेलने पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. त्याची तपासणी पोलिस करणार आहेत. ज्या घरात इंग्रजी येत नाही त्याची घरात इंग्रजी चॅनेल सुरु असल्याचे मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. फॉल्स टीआरपीसाठी एक टोळी कार्यरत आहे. आणि हे रॅकेट मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले आहे. दरम्यान, या तीनही चॅनलच्या प्रमुखांच्या चौकशी होणार आहे.

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी ४०० ते ५०० रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल, अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळ – विखे पाटील

News Desk

सरकार राज्यातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागलं लक्ष

News Desk

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

News Desk