HW News Marathi
देश / विदेश

‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’, जितेंद्र आव्हाडांचा योगींना टोला

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच लोकसंख्या धोरण जाहीर केले होते. यामध्ये राज्याची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. अशा प्रकराचे धोरण जाहीर करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथांच्या या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करणारे एक ट्विट केले आहे.

‘देशात १३ टक्के मुस्लिमांना दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर ८३ टक्के हिंदूंना दोन पेक्षा जास्त मुलं आहेत. लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रद करण्याचा डाव आहे’, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला होता. पण यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी आव्हाड यांच्या टीका करत त्यांना ट्रोल केले. काही जणांनी कौटुंबिक पातळीवर जात आव्हाड यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले. त्यामुळे या ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत आव्हाड यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केले आहे.

 

 

आज केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘आणि मला एकाच मुलगी आहे आणि ती राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’. सोबतच आव्हाड यांनी काल केलेले ते ट्विट पुन्हा रिट्विट केले आहे. भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केल्याने आव्हाड यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केल्याचे यानिमित्त दिसून आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याच्या जबाबदारीतून पळ काढू नये !

News Desk

Karnataka Crisis : विधानसभेत आमदारांनी घालविली रात्र, तर आज ठरणार कुमारस्वामींचे भवितव्य

News Desk

उत्तर भारतात ४१ पूरबळी!

News Desk