HW News Marathi
महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांची शरद पवारांवर सिरीज’साहेब माझा विठ्ठल ‘

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल किती आदर आणि प्रेम आहे हे संपुर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी पुढचा १ महिना शरद पवारांनी गेल्या ५० वर्षांत केलेली कामगिरी एका खास सिरीजच्या माध्यमातून सांगणार असल्याची घोषणा केली आहे.

आषाढी एकादशी निमित्त जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. या संदर्भात माहिती देणारी एक फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे. साहेबांबद्दल समज गैरसमज खूप पसरवले गेले. खासकरून कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केलं असल्याचं आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मागच्या ५० वर्षात जे प्रचंड काम साहेबांनी या देशासाठी,राज्यासाठी,राज्यातील महिलांसाठी केले आहे, ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते. सोबतच साहेबांनी देखील केलेल्या कामाचे कधी मार्केटिंग केले नाही. आजच्या अंबाणीच्या सेल्समनसारखा काहीच न करता नुसती जाहिरातबाजी साहेबांनी केली नाही. साहेब ज्या ठिकाणी होते तिथे त्यांनी आपलं काम,आपलं कर्तव्य आणि देशसेवा समजून केलं होत आणि करत आहेत, असं आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

थोडंस जाणून घेऊयात आपण शरद पवारांविषयी आणि त्यांच्या अवाढव्य कामाविषयी. आजपासून १ महिना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती देत राहू. जमलं तर नक्की वाचा. टीका तर नेहमीच करता आपण .यावेळी त्यांना थोडं जाणून घ्या. तुमच्या मतात नक्की फरक पडेल हा विश्वास आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?”

News Desk

गुलाबराव पाटील यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी दिली महत्वाची माहिती

News Desk