पुणे | देशात १८ च्या पुढील वयोगटातील लोकांचं लसीकरण सुरु आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसांठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात असल्याने लहान मुलांना लस देण्याची खटपट सुरु आहे. त्यासाठी काही लसींची चाचणी करण्याची खटपट सुरु आहे. अशात सिरम इन्स्टिट्युटच्या कोवोवॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी परवानगी देण्याचं तज्ज्ञांनी नाकारलं आहे. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. २ ते १७ वर्षे वयोगटातल्या मुलांवर चाचणी करण्याची परवानगी सिरम इन्स्टिट्युटने मागितली होती.
Government panel recommends against allowing Serum Institute of India to conduct phase 2 & 3 clinical trials of Covavax #COVID19 vaccine on children of age 2-17 years: Sources pic.twitter.com/loOhzpjyFe
— ANI (@ANI) July 1, 2021
सिरमने भारताच्या औषध नियंत्रकांकडे सोमवारी ही परवानगी मागितली होती. सिरमला एकूण ९२० लहान मुलांवर कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीची चाचणी करायची होती. त्यापैकी ४६० मुलं १२ ते १७ वर्षे वयोगटातली होती. तर उरलेली २ ते ११ वर्षे वयोगटातली होती. १० ठिकाणी ह्या चाचण्या होणार होत्या. मात्र भारताच्या औषध नियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञांच्या समितीने कोवोवॅक्सच्या चाचण्यांना परवानगी नाकारली. ह्या लसीला अद्याप कोणत्याही देशाने लहान मुलांसाठी मान्यता दिली नसल्याचं कारण देण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे
कोरोनावरील ‘कोवोव्हॅक्स’ लसीचं उत्पादन गेल्या आठवड्यापासून सुरु झालं आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.