HW News Marathi
देश / विदेश

मोदींवर टीका करणाऱ्या पत्रकाराला ‘आजतक’ने केलं ​निलंबित!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक जण टीका करताना आपल्याला दिसतात. अशीच एक टीका करण्याऱ्या एका पत्रकाराला आज तक ने निलंबित केलं आहे. या पत्रकाराने स्वत: ट्विटवरुन याची माहिती दिली आहे. श्याम मीरा सिंग यांनी 17 जुलै रोजी पहिल्यांदा एक ट्विट केले होते, त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, “यहाँ ट्विटर पर कुछ लिखता हूँ तो कुछ लोग मेरी कंपनी को टैग करने लगते हैं. कहते हैं इसे हटाओ, इसे हटाते क्यों नहीं… मैं अगला ट्वीट और अधिक दम लगाकर लिखता हूँ. पर इसे लिखने से पीछे नहीं हटूँगा कि Modi is a shameless Prime Minister.”, असं ट्विट त्याने केलं आहे.

लोकशाहीवर वर गदा

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट केल्यामुळे पत्रकाराला निलंबित केलं असून, हा लोकशाहीचा अन्याय आहे, अशी चर्चांना उधाण आलंय. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशाप्रकारे गदा आली आहे आणि मोदींविरोधात बोलणाऱ्यांवर काय कारवाई होते, त्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

पंतप्रधान मोदींचा आदर करा असे सांगण्याआधी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा आदर केला पाहिजे

श्याम सिंगला निलंबित करण्याआधी त्याने पंतप्रधानांवर निशाणा साधला. “पंतप्रधान मोदींचा आदर करा असे सांगण्याआधी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा आदर केला पाहिजे” अशाप्रकारे त्यांनी आपली वैयक्तिक मते मांडली होती. पण त्यांना इंडिया टुडे ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. कंपनीने त्यांना मेल केलवा आङे. श्याम मीरा सिंग यांना कंपनीच्या सोशल मीडिया पॉलिसीचे उल्लंघन केले आहे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या चॅनेलच्या बातम्या फक्त सोशल मीडियावर टाकाव्या आणि आपली वैयक्तिक मते व्यक्त करु नयेत या धोरणाचे वारंवार उल्लंघन केल्याने आपल्याला काढून टाकण्यात येत आहे, असा मेल कंपनीने त्यांना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला आणखी एक धक्का, NDAमधून ‘या’ पक्षाचाही काढता पाय

News Desk

कैफने केले इम्रान खान यांना क्लीन बोल्ड

News Desk

…फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं !

News Desk