HW News Marathi
व्हिडीओ

“मोदींच्या भाषणात विरोधकांचा दंगा,मोदी भडकले!”

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. इतक्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल असं मला वाटलं होतं असा टोला यावेळी त्यांनी लगावला. दरम्यान यावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरु होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं.

#NarendraModi #SansadBhavan #Delhi #Parliament #LokSabha #MonsoonSession #BJP #India #Corona

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस,पंकजा मुंडेंकडून पुण्यातल्या तरुणीच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी,शिवसेना मंत्र्याचा संबंध?

News Desk

महाराष्ट्र सरकार आणि CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांच्यातला नेमका वाद काय?

News Desk

जळगाव महिला वसतीगृहात ‘ती’ घटना घडलीच नाही ! सभागृहात अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

News Desk