HW News Marathi
Covid-19

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु केले जाणार – मुरलीधर मोहोळ

पुणे | राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली. नुकतंच पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे शहरातील विविध भागात ५५० कोविड केअर बेड उपलब्ध आहेत. तर खासगी रुग्णालयात ही बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणेकरांनी नियमांचं पालन करा

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करत आहोत. येत्या आठ ते दहा दिवसांत ५५० बेड उपलब्ध होतील. आज 55 बेड उपलब्ध होतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटल चालकांची बैठक आयुक्त घेणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी नियमांचं पालन करावे, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८२.९४ टक्के…

News Desk

केंद्र सरकारने पेन्शनधारकांच्या महगाई भत्त्याला दिली स्थगिती

News Desk

भारत सरकारने राज्यांना योग्य ‘ती’ आर्थिक मदत दिली पाहिजे, पवारांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk