HW News Marathi
Covid-19

‘कोर्ट’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन

नागपूर | नागपूरमधील विचरवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांनी रेखाटलेली भूमिका प्रचंड गाजली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना काल मध्यरात्री वीरा साथीदार यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली होती. विविध ठिकाणी ते मार्गदर्शनपर व्याख्याने देत होते. पुढे पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले. ते काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादनही त्यांनी केले होते. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी देखील कार्यरत होते.

‘कोर्ट’ चित्रपटात साकारली भूमिका

६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला होता. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होता. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे निधन

News Desk

राज्यात २,९४० नवे कोरोनाबाधित तर ८५७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

“सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर ५००० प्रवास भत्ता द्या”, भाजपची मागणी

News Desk