HW News Marathi
Covid-19

जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये सुविधांच्या अभावी १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा?

पुणे | पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये ४० डॉक्टर स्टाफ, ८० नर्सिंग स्टाफचा समावेश आहे. राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी जम्बो मध्ये सुविधांचा अभाव असल्याची ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली होती. औषध साठा, उपचार सामुग्रीचा पुरवठा होत नसल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या.

पुण्यातील हे जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप वारंवार करण्यात येत आहे. हे रुग्णालय चालवण्यासाठी पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत आणखी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने या रुग्णालयात पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यातील कोवि़ड-19 ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी तब्बल 80 कोटीहून अधिक खर्च आला आहे. परंतु हे रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने वाढत आहे. रुग्णालयात पुढे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु होण्याची चिन्हे, आय़ुक्तांचं सूचक वक्तव्य

News Desk

कोरोनानं आई-वडील गमावलेल्या मुलांना सावरत त्यांना मोफत शिक्षण द्या, सोनिया गांधींचं नरेंद्र मोदींना पत्र

News Desk

#Lockdown5 : देशात कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला

News Desk