HW News Marathi
Covid-19

सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु होण्याची चिन्हे, आय़ुक्तांचं सूचक वक्तव्य

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने सामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास बंद केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या लोकांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. परंतू मुंबई दुसरी लाट ओसरत असल्यामुळे मुंबई महापालिका येत्या काळात लवकरच सामान्यांसाठी लोकल प्रवास खुला करण्याचा विचार करत आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, पुढच्या आठवड्यात टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक आहे, यात काही निर्बंध हटवले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईत लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत महापालिका राज्य सरकारला विनंती करणार आहे. मुंबईत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रत्येक दिवसाची रुग्णसंख्या ही ५०० पेक्षा कमी आहे आणि डबलिंग रेटचीही चिंता न करण्यासारखा आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात महापालिका राज्य सरकारला दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाची परवानगी मिळाली असा प्रस्ताव पाठवू शकतं असे संकेत चहल यांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिकेने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना डोमेस्टिक विमान प्रवासादरम्यान कोरोनाच्या RTPCR चाचणीची अट शिथील केली आहे. यासंदर्भात महापालिकेने राज्य सरकारला पत्रही लिहीलं आहे. मुंबई लोकल ही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लाईफलाईन ओळखली जाते. परंतू कोरोना काळात ही सेवा सामान्यांसाठी बंद असल्यामुळे अनेकांना कामावर जाताना त्रास सहन करावा लागत होता.

बस किंवा खासगी वाहनाने ऑफीस गाठताना ट्रॅफीकमध्ये मोडणारा वेळ, खर्च होणारा पैसा आणि त्यात वाढती महागाई यामुळे सामान्य मुंबईकर मेटाकुटीला आलेला असताना महापालिकेने हे संकेत दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रस्तावावर अंतिम निर्णय कधी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही लोकांना हौस असते आंदोलन करण्याची ! अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

News Desk

…म्हणून अजिंक्य राहाणेंनी केले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे कौतुक

News Desk

अदानी शरद पवारांना जाऊन भेटले अन् …! राज ठाकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप 

News Desk