HW News Marathi
महाराष्ट्र

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने घेतला पहिला बळी

कोल्हापुर | राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील पहिला बळी गेला. प्रमोद जमदाडे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने रयत ऍग्रो संस्थेकडे अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. केलेल्या गुंतवणुकीतून परतफेड म्हणून केवळ नैराश्यचं आल्याने प्रमोद यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. प्रमोद जमदाडेने रयत ऍग्रोच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्येही सहभाग नोंदवला होता. तसेच मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात सहभागी होत पन्हाळा तालुक्यातील गुंतवणूकदारांचे नेतृत्वही त्याने केले होते. रयतमध्ये केलेल्या गुंतवणुकीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने संतप्त गुंतवणूकदारांनी रयतचा म्होरक्या सागर सदाभाऊ खोत याची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणीही केली.

प्रमोद जमदाडे या २५ वर्षीय तरुणाने रयत ऍग्रोच्या कडकनाथ कोंबडी प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली होती. अल्पकाळात मोठा लाभ मिळणाऱ्या जाहिरातीला तो भूलला आणि कर्ज काढून त्याने सुमारे अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. आर्थिक कुवतीपेक्षा अधिक असलेल्या या करमेचे हफ्ते थकित राहिल्याने हप्त्याचा ससेमिरा सुरु होता, असे सांगण्यात आले. प्रकल्पात फसवणूक केली झाल्याने त्याने १८ जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते. तातडीने त्याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यवर उपचार सुरू असतानाच आज (२१ जानेवारी) त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच रयतमध्ये गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार तसेच नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. गुंतवणूकदारांनी रयत प्रमुख माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

काय आहे ही कडकनाथ कुक्कुटपालन ही योजना?

सुरुवातीला शेतकऱ्याला पैसा गुंतवावा लागत होता. यामध्ये लागणारं खाद्य हे कंपनी देत असे. कोंबडी आणि अंडी हे कंपनी पैसे देऊन विकत घेणार होती. ज्यामध्ये शेतकऱ्याला वर्षाला अडीच ते तीन लाखापर्यंतचं आमीष दिलं गेलं होतं. सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची अशीच फसवणूक झाली. पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीचे मालक फरार झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसे चौकशीला सहकार्य करत असतील तर अटकेची गरज काय? उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल

News Desk

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग! – उपमुख्यमंत्री

Aprna

इंधन दरवाढीनंतर आता वीज महागणार

News Desk