HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

कडकनाथ घोटाळा प्रकरण | राजू शेट्टी स्वतःच ईडीच्या कार्यालयात दाखल

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काहीच दिवसांपूर्वी ‘कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळा’ प्रकरणी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप केले होते. “सदाभाऊ खोत हे कडकनाथ घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप राजू शेट्टींनी केला होता. आता याच घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी हे चक्क स्वतःच मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी राजू शेट्टी यांनी ईडीचे संचालक सुशीलकुमार यांची भेट घेऊन कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यात हजारो लोकांची फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे, या प्रकरणी ईडीकडून तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली आहे.

“४०० ते ५०० कोटींच्या कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यात हजारो लोकांची फसवणूक झाली आहे. यात मनी लाँडरिंग झाले आहे. ईडीने तातडीने याप्रकरणी कारवाई करून गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राजू शेट्टी यांनी ईडीकडे केली आहे. त्याचप्रमाणे, या प्रकरणी ईडीकडूनचौकशीची मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांच्याप्रमाणे या प्रकरणी लोकांनी केलेल्या तक्रारी आणि पावत्यादेखील त्यांनी ईडीकडे सोपविल्याची माहिती मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी याच प्रकरणी राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली होती.

…तर राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी !

“कडकनाथ प्रकरणी राजू शेट्टी व त्यांचे समर्थक निव्वळ राजकीय द्वेषातून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. ते माझ्यावर तथ्यहीन आरोप करत आहेत. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिध्द करावेत. मी कोल्हापुरातील बिंदू चौकात यावर जाहीर चर्चा करण्यास तयार आहे. कडकनाथ घोटाळा प्रकरणात माझा कोणताही संबंध असल्याचे सिध्द झाले तर मी राजीनामा देईन. मात्र, जर ते माझ्यावरचे आरोप सिध्द करु न शकले नाहीत तर राजू शेट्टी यांनी भर चौकात विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी”, अशी अत्यंत खालच्या स्तराची टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली होती.

Related posts

#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात !

News Desk

नांदेड जिल्ह्यातील अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा  

News Desk

‘आप’ महाराष्ट्रात ठराविक जागांवर निवडणुका लढविणार !

News Desk