टोक्यो | डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण पदकाची संधी कमलप्रीतच्या हातातून निसटली आहे. डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र अंतिम स्पर्धेत ती खास कामगिरी करु शकली नाही. ज्यामुळे तिला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. सहा प्रयत्नांत ६३.७० मीटर हा तिचा सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला. स्पर्धेत अमेरिकेच्या वेलेरी ऑलमॅन हिने तब्बल ६८.९८ मीटर लांब थ्रो करत सुवर्णपदक पटकावलं आहे.
हॉकी संघाला अपयश
टोकियो ऑलिम्पिकमधल्या हॉकीच्या सेमीफायनच्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने भारताचा ५-२ ने पराभव केला आहे. बेल्जियमने भारताचा ५-२ असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारतीय संघाचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मात्र, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे. भारताने बेल्जियमशी दोन हात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण अखेर बेल्जिअमने भारताचा ५-२ असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे.
कोण आहे कमलप्रीत कौर?
कमलप्रीत कौर पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील बादल गावची रहिवाशी आहे. तिने स्वत:च सांगितलं होतं की मी अभ्यासात जास्त हुशार नसल्याने प्रशिक्षकांनी मला एका राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सांगितलं होतं. तिथे मी चांगल प्रदर्शन दाखवलं होतं. अभ्यासात जास्त हुशार नसल्याने कमलप्रीतला खेळांमध्ये जास्त लक्ष द्यावं असं वाटलं. ज्यानंतर तिने या डिस्कस थ्रोमध्ये अधिक सराव करत आज इथवरचा प्रवास पूर्ण केला आहे. २०१९ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ती पाचव्या स्थानावर होती. २०१९ संस्करणमध्ये ६०.२५ मीटर डिस्कस थ्रो करत तिने सुवर्ण पदकही पटकावलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.