HW News Marathi
महाराष्ट्र

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे! 

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या, संजय राऊतांसोबतच्या वादामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आज (२९ डिसेंबर) सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाने हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगनाने त्यावर बोलायचे टाळले.दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईला POK म्हटल्याने कंगना चर्चेत आली होती. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला फटकारले होते.

यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटवर वॉर झालेले पाहायला मिळाले होते. मधल्या काळात मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या वांद्रे पश्चिम येथील कार्यालय तोडले होते. त्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर कंगना हिमाचल प्रदेशमध्ये होती. अखेर रविवारी कंगना पुन्हा मुंबईत परतली होती. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कंगना आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.

 

https://twitter.com/KanganaTeam/status/1343816766422577154?s=20

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी हसन मुश्रीफांनी देशाची माफी मागावी, भाजपची मागणी

News Desk

भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

Aprna

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

News Desk