HW News Marathi
महाराष्ट्र

स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देतायत – कंगना राणावत   

नवी दिल्ली | काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदलोन जे गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरु आहे त्याला हिंसक रुप लागलेले पाहायला मिळाले. काल शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या घटनेवर भाष्य करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका, असं तिने म्हटलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन पोस्ट केला आहे. कंगना राणावतने या पूर्वी देखील या आंदोलनाबाबत अनेक वादग्रस्त विधानं केलेले होते. आज सकाळपासूनच दिल्लीमधील शेतकरी आंदोलन चिघळल्यामुळे तिने पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावर घणाघात केलेला आहे.

“ प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला आणि तिथं खलिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आजचा प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशासाठी आनंदाचा ठरला असता. मात्र, लाल किल्ल्यावरुन जे फोटो आले आहेत ते मन हेलावून टाकणारे आहेत. स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. हे खुलेआम होत असून सर्वांच्या समोर हा तमाशा सुरु आहे. जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल तर आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही. आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो. दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले तरी आपण नग्न होऊन बसतो. यामुळे या देशाचं काहीही होणार नाही. जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचं सर्वोच्च न्यायालय, इथलं सरकार हे सर्व थट्टा बनून राहिलं आहे,” अशा शब्दांत कंगनानं या घटनेवर भाष्य केलं आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1354015055076073472?s=20

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची आज जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेत बैठक 

News Desk

राज्याचा अर्थसंकल्प: कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज,आरोग्यसेवेसाठी ७ हजार कोटींचा प्रकल्प

News Desk

खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk