HW News Marathi
महाराष्ट्र

ड्रग्स रॅकेट उघड करणे हा माझा गुन्हा ठरला – कंगना राणावत

मुंबई | शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला असे शिवसेना खासदार संजय राऊत स्पष्ट केले असले तरी कंगनाचे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील हल्ले सुरूच आहेत. आज (१४ सप्टेंबर) मुंबई सोडून चंदिगढला रवाना झालेल्या कंगनाने पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

कंगनाने ट्विटमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. ‘मी मुव्ही माफिया, सुशांतचे मारेकरी आणि ड्रग रॅकेटला उघडं पाडतेय, हीच गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय, हीच त्यांची समस्या आहे. हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे,’ असे ट्विट कंगनाने केले आहे.

‘चंदिगढमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. यावेळी मी वाचले, असं वाटतं. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीत उबदारपणा जाणवत होता आणि आज असा दिवस आहे, जेव्हा जीव वाचला म्हणजे खूप काही मिळाल्यासारखं वाटत आहे. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशत माजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे,’ अशा शब्दांत कंगनानं शिवसेनेवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादच्या नामांतरावरुन मराठा समाज आक्रमक, बाळासाहेब थोरातांच्या फोटोला मारले जोडे

News Desk

आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष भरकटविण्यासाठी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची शहांची खेळी !

News Desk

खेडेकर हे काय तुमचे जावई आहेत का? कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

Aprna