HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंनी जी सेना निर्माण केली ती आता ‘सोनिया सेना’ झाली!

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री कंगना राणावतने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत संबोधत आव्हान देऊन अवघे काही तास उलटले नाहीत, तोच कंगनाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

“श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका” असे ट्वीट कंगनाने केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरुन कंगनाने निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळेच दोषी सुटले आणि बाबरी फाईल बंद, मग बाबरी पाडली कोणी? – सामना

News Desk

नारायण राणे राज्यसभेवर तर मुले आमदार?

News Desk

भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर ?

News Desk