मुंबई | ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिची चौकशी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (८ सप्टेंबर) विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यावर उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कंगना राणावत हीचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
कंगनाने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर तिच्यावर कलाक्षेत्रातून आणि राजकीय क्षेत्रातून टीकेची झोड होती. एवढंच नाही तर संजय राऊत आणि कंगना यांच्यात आरोपांच्या फैरीही झडल्या. अशा सगळ्यात अधिवेशनामध्ये कंगनाचा विषय समोर आणला गेला. कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्तावही आणला गेला. ९ तारखेला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज प्रकरणात कंगनाची चौकशी होईल असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
As per request submitted by MLAs Sunil Prabhu & Pratap Sarnaik, I answered in Assembly & said that Kangana Ranaut had relations with Adhyayan Suman, who in an interview said she takes drugs & also forced him to. Mumbai Police will look into details of this: Maharashtra Home Min pic.twitter.com/4ztVcqtP71
— ANI (@ANI) September 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.