HW News Marathi
महाराष्ट्र

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक होणार तिरंगी, पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला चर्चेतून काढता पाय

सातारा | कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक आता तिरंगी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण सत्ताधारी पॅनलविरोधात एकत्र आघाडी तयार करण्याचे प्रयत्न फळाला येत नसल्याचं दिसतं आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आघाडी तयार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रयत्न केले होते पण त्या चर्चेतून बाहेर पडत असल्याचं चव्हाणांनी जाहीर केलं आहे. त्यामुळेच आता तिरंगी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोणाची कोणाच्या विरोधात लढाई?

पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची महत्वाची ओळख आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनल हे सत्ताधारी आहे. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ.अतुल भोसले यांनी अर्जही दाखल केला आहे. सत्ताधारी पॅनलच्याविरोधात एक आघाडी तयार करावी यासाठी प्रयत्न केले गेले होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि दुसरे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांना एकत्र आणण्यासाठी हालचाली केल्या होत्या. सहकारी राज्यमंत्री विश्वजीत कदमही या प्रकियेत होते. पण दोन्ही माजी चेअरमनना एकत्र आणण्यात यश आल्याचं दिसत नाही. त्यातच आता खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी ह्या मनोमिलनाच्या चर्चेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे. आता सभासदच निर्णय घेतील असं चव्हाण म्हणालेत.

कशी होणार तिरंगी लढत?

मनोमिलनाचे प्रयत्न आता थांबल्यात जमा आहेत. त्यामुळे तिरंगी लढत निश्चित मानली जाते आहे. डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतूल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांच्या संस्थापक पॅनल आणि इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलचे आव्हान असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

TRP घोटाळा – रिपब्लिक चॅनलच्या ३ अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

News Desk

मंत्रालयातील सुसज्ज स्टुडिओचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन         

News Desk

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचारच सुचणार – अतुल भातखळकर

News Desk