HW News Marathi
महाराष्ट्र

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. धनंजय मुंडे काही काळा पूर्वी चर्चेत होते. करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत जनतेसमोर आल्या होत्या. याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि करुणा मुंडे या त्यांची पत्नी असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. काही महिन्यांनतर हा वाद आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे.

काय बोल्या करुणा मुंडे?

करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वरून लाईव्ह करत माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं कळवलं आहे. “माझ्यासोबत गेली ७-८ महिने जे सुरु आहे ते सर्व सांगण्यासाठी मी परळीमध्ये रविवारी १२ वाजता जाणार आहे. माझे पती धनंजय मुंडे यांच्या घरी मी पत्रकार परिषद घेणार आहे. मी नेमकी कितवी पत्नी आहे? पाचवी कि सहावी? याबाबतचे सत्य नेमके काय आहे? याचा खुलासा करणार आहे, असं म्हणत करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर टाकली आहे.

आतापर्यंत मला खूप वेळा धमकावलं गेलं आहे. माझ्या हाती अनेक गोष्टी लागल्या आहेत. त्या मी सोशल मीडियावर शेअर करणार तोच मला माझ्या मुलीच्या वयाच्या एका तरुणीने फोन करुन धमकावलं. मी तिला अजिबात घाबरणार नाही”, असंही करुणा मुंडे या फेसबुक लाईव्हमध्ये म्हंटलं आहे.

पंकजा मुंडेंविरुद्ध कोणतं षडयंत्र?

करुणा मुंडे यांनी या लाईव्ह मध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचाही उल्लेख केला आहे. ‘पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांनी अनेक षडयंत्र रचले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत मी तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या पाठिशी उभं राहणार आहे. माझ्या पतीने मला अनेक नेत्यांबद्दल सांगितलं आहे. पण मला त्यांच्यात पडायचं नाही. पंकजा मुंडे या माझ्या नणंद लागतात. घरातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतची ही माहिती मी देऊ शकते’, असं म्हणत करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी लोकही आज त्यांच्याच मुलींना मागे टाकत आहेत. पंकजा मुंडे यांच्या विरोधात काय षड्यंत्र आखलं जात आहे? हेही मी माध्यमांसमोर मांडणार आहे. माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस. मी तिचं ऐकलं नाही म्हणून भोगत आहे, असंही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरसंघचालक मोहन भागवतांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत ?

News Desk

काँग्रेस पक्षाने कारवाई करत सत्यजीत तांबे यांना केले निलंबित; नाना पटोलेंची माहिती

Aprna

लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Manasi Devkar