HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्मा कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. १२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी करुणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. 

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. येत्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत करुणा शर्मा शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. शिवशक्ती हा करुणा शर्मा यांचा पक्ष आहे. शर्मांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. शिवशक्ती पक्ष स्थापन केल्यापासून करुणा शर्मा यांची ही पहिली निवडणूक असणार आहे. 

या पोटनिवडणुकीत भाजपकडून सत्यजित कदम यांचे नाव निश्चित असल्याच्या चर्चा आहेत. सत्यजित कदम हे गेल्या १० वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. २०१४ च्या कदमांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. कदम हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नातेवाईक आहेत. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशा शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सर्व पक्षांनी त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, लसीवरुन राजकारण न करण्याचा दिला सल्ला

News Desk

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

Aprna

नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार!

News Desk