HW News Marathi
महाराष्ट्र

‘करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर!’ कोठडीत 18 सप्टेंबरपर्यंत वाढ

बीड | अंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना आणखी काही काळ न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

नेमकं काय घडलं?

करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 6 सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे न्यायालय आज करुणा शर्मा यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

करुणा शर्मांच्या वकिलाचा आरोप

या सुनावणीवेळी तपास अधिकारी आणि फिर्यादी गैरहजर होते. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या वकिलाने पोलीस याप्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. आता 18 सप्टेंबरला करुणा शर्मा यांना जामीन मिळणार की नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणे हीच दोन मोठी आव्हाने !

News Desk

“मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे”, राम कदमांची ती ऑडिओ क्लिप वायरल 

News Desk

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मोहटा देवस्थानला माहिती अधिकार लागू

News Desk