HW Marathi
कोरोना देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

राज्यातले कोरोनाग्रस्त रूग्ण होतायतं बरे ! कस्तुरबा मध्ये १२ जणांची टेस्ट निगेटिव्ह

मुंबई | पुण्यानंतर आता मुंबईतुनही दिलासादायक बातमी आली आहे. पुण्यातील दोन रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील १२ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.तर औरंगाबादमधील एका कोरोनाबाधित महिलेला घरी सोडण्यात आले आहे. पुन्हा एकदा मुंबई आणि पुण्यातील रूग्णांची चाचणी घेण्यात येणार असून नंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ झाला आहे. मात्र महाराष्ट्र प्रशासन हा आकडा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशामध्ये यामुळे ५०० पेक्षा जास्त रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.सध्या महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे,तरीसुद्धा लोक ठिकठिकाणी गर्दी करत आहेत.

Related posts

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेना खासदारांची दिल्लीत घोषणाबाजी

News Desk

बाबा सिद्दीकीची ४६२ कोटी संपत्ती जप्त ईडीची कारवाई

News Desk

‘रेप इन इंडिया’ व्यक्तव्यावर माफी मागणार नाही, राहुल गांधींची ठाम भूमिका

News Desk