HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१ वर, तर पुणे ३, सातार १ रुग्णांची वाढ

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०० पार गेला असून पुण्यात आणखी ३ रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांच्या संख्ये वाढ होऊन १०१ वर गेली आहे. यामुळे सध्या राज्यात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचार बंदी लागू केली आहे. यामुळे कदाचित राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात गेल्या १२ तासात ४ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. साताऱ्यात काल रात्री एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. कॅलिफोर्नियाहून प्रवास करुन आलेली ६३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. साताऱ्यात एका दिवसात दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील एकाच कुटुंबातील चौघांना लागण झाली आहे. या चौघांचाही सौदी अरेबिया प्रवासाचा इतिहास आहे.

कस्तुरबा रुग्णालयात भरती १३ मार्च रोजी झालेल्या ५९ वर्षीय फिलीपाइन नागरिकाचा काल (२३ मार्च) रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णाचे नंतरचे दोन नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले होते म्हणजे त्याचा कोरोनो हा आजार बरा झाला होता तथापि त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा

मृत्यू झाला. हा मृत्यू करोनामुळे झालेला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

राज्यातील कोरोनाग्र्तांची अशी आहे संख्या

मुंबई – ४०

पुणे – १९

पिंपरी चिंचवड – १२

कल्याण – ५

सांगली – ४

नागपूर – ४

यवतमाळ – ४

नवी मुंबई – ३

अहमदनगर – २

सातारा – २

ठाणे – २

पनवेल – १

औरंगाबाद – १

रत्नागिरी – १

उल्हासनगर – १

एकूण – १०१ कोरोनाग्रस्तांचा आकडा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीत; मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

News Desk

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा, रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

वस्तुस्वरुपात मिळणारा शासकीय लाभ आता रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात होणार जमा         

News Desk