मुंबई | विरोधी पक्ष हे नेहमीच महाविकासआघाडी विरुद्ध टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महापूजेसाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. या वरून आता राजिक्य वातावरणात पुन्हा वादाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावरुनच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केलीय.
केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांवर जबरदस्त टीका
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर वरून उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधून हल्ला केला आहे. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ अशा ओळीद्वारे उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
जनतेचे जिणे हराम
मुख्यमंत्र्यांचे घरातून कामपावसाने मुंबईचा चक्का जाम
मुख्यमंत्र्यांचे घरातूनच कामएमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम
तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच कामतुका म्हणे माझा
विठ्ठल झाकोळला…
वारकरी भक्तांना
बसवुनी घरी,
फोटोमध्ये झळकती
मुख्यमंत्री…— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 19, 2021
मुख्यमंत्री स्वतः गाडी चालणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.उद्या (२० जुलै २०२१) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज (१९ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला.
मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.