HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

खडसेंनी माझा प्रचंड छळ केला, याला देवेंद्र फडणवीसही जबाबदार !

मुंबई | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकला. खडसे उद्या (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, खडसेंनी बुधवारी (२१ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडत असल्याची अधिकृत करतानाच अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर खडसेंनी केलेल्या आरोपांना आज (२२ ऑक्टोबर) दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. ” कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही”, असा थेट इशाराच दमानिया यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे.

खडसें एवढा माझा छळ कोणीही केला नाही ! 

अंजली दमानिया आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या कि, “एकनाथ खडसे हे धादांत खोटं बोलत आहेत. त्यांच्याविरोधात विनयभंगाचा खटला अद्याप संपलेला नाही. या प्रकरणी जर आरोपपत्रच दाखल झालेलं नाही तर मग खटला कसा संपेल ?”, असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यापुढे, “खडसेंनी त्यांच्या वाढदिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं होतं. मी भाजप नेते नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. मात्र, खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कोणीही केला नाही”, असा गंभीर आरोपही यावेळी अंजली दमानिया यांनी केला आहे.

अमृता फडणवीसांविषयी जर खडसे असं बोलले असते तर …? दमानीयांचा फडणवीसांना सवाल 

अंजली दमानिया यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयीचं राजकारण केलं. खडसे जे माझ्याबद्दल बोलले ते जर ते अमृता फडणवीस यांच्याबद्दल बोलले असते तर फडणवीस शांत बसले असते का?” असा सवालही अंजली दमानिया यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

युती तुटल्याचा आम्हाला आनंद | राऊत

News Desk

सर्वोच्च न्यायालयने कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली

News Desk

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

News Desk